आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांची घाटकोपर येथे सभा झाली. या सभेनंतर गुरुजी घरी जेवायला आले. त्यावेळी, आजतागायत आम्ही जे अनुभवत आलो आहोत त्याहीपेक्षा गुरुजी यांनी त्या दिवशी जी प्रचिती दिली, त्यामुळे आमचा स्त्री जन्म सार्थकी लागला. ती गोष्ट मी आज जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हा सर्वांसमोर पुन्हा एकदा शेयर करत आहे.
तर गुरुजी म्हणाले, देश चालतो तो आया बहीणींच्या जिवावर. हा देश नेते, पक्ष अहह अजिबात यांच्या जीवावर चालत नाही. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचे व्रत घेऊन जगणारी माणसे त्यांच्यामुळे हा देश चालतो. आम्हा पुरुषांना याची जाणीव नसते त्यामुळेच तर वांदे आहेत. गळ्यातली माळ, त्यातला फक्त दोरा काढून घ्या, त्या माळेला अर्थ नसतो. तशीच या संसारामध्ये दोरा असलेली व्यक्ती म्हणजे आई-बहीण म्हणजेच स्त्री. हे आम्हा पुरुषांना कळत नाही.
आमच्याकडे (सर्व महिला) पाहून गुरुजी म्हणाले, तुम्ही काही शाहाण्या व्यक्ती नाहीत. खुळे लोक.. त्याचे नाव आई. जिला स्वत: चे काही कळत नाही. आईकडे, पत्नीकडे असते ते काळीज आमच्याकडे (पुरुषांकडे) केवळ फुफ्फुसे.
मी बऱ्याचदा म्हंटले आहे, आईला थोडे आठव रे (गुरुजींच्याही डोळ्यात अश्रु होते पुढे.). मग तू जरा नीट वागशील. ती कशी असते ती बघ. देशात असा गुरु नाही. तो फक्त एकच ती म्हणजे आई. मग या देशाचे बळ काय?
आई इतका पियुष समदुजा शब्द नाही जगात ।
आई वाचुन सकल जग हे शुन्यवत नाशवंत ।।
आई रुपे जगतजननी जन्म घेइ अनेक ।
आई उंची श्रुती न आकळे तिही झाली अवाक ।।
पत्नी ही लग्न झाल्यापासून व्रत घेऊन जगते. कोणचं व्रत? पतीचे. तिला जागेपणी, झोपतेपणी, अर्ध झोपेत, कामात कोणत्याही क्षणी, ध्यानी मनी केवळ आणि केवळ पतीचा विचार असतो. लग्नात गाठ बांधल्यापासून ती केवळ आणि केवळ नवऱ्याचा विचार करते. ती सत्यवान सावित्रीचे व्रत करते. पतीव्रतेचे व्रत करते. कसाही असला तरी सात जन्म ती याच पतीला मागते. तिच्या उरात, चित्तात जसे पतीव्रतेचे व्रत आहे, तसेच व्रत आपण पुरुषांनी हिंदवी स्वराज्याचे घेतले पाहिजे. ही रेल्वे, ही शेती, हे उद्योग.. हे देशाचे बळ, प्राण नाहीच. हिंदवी स्वराज्याचे व्रत घेतलेले लोक हे या देशाचे प्राण आहेत.
मुलगा म्हणतो माझा टॉवेल, दुसरी मुलगी म्हणते माझं अंथरूण, माझं कपाट. पण खुळचट असतात त्या आया. ज्या कधीही स्वत: चा विचार करत नाहीत. माझं म्हणून पाहत नाहीत. ते सगळ्यांचा विचार करतात. त्या संसारी असून संन्यासी जीवन जगतात त्यांचे नाव आई.
तसं शिवछत्रपतींचे व्रत घेतलेली मंडळी ज्यांना स्वत:चे काही कळत नाही. मान-अपमान काही कळत नाही. फक्त भारतमाता, हिंदू समाज आणि हिंदू संस्कृती बस्स इतकंच कळतं.
यापुढे जाऊन गुरुजी जे बोलले त्याने आमचे डोळे अजून पाणावले..
गुरुजी म्हणाले, दिवाळीत आपण सर्वजण लक्ष्मीपूजन करतो. प्रत्येकजण आपापल्या शक्तीप्रमाणे मंदिरातल्या देवीची पूजा करतो. पण, आपण घरातल्या पत्नीकडे दुर्लक्ष करतो. दिवाळीत लक्ष्मीपूजना दिवशी सर्वांनी आपल्या पत्नीला बसवून, तिचे पाय धुवून औक्षण करावे, तिची पूजा करावी, कारण घरची लक्ष्मी पत्नी आहे.

आपण निर्जीव लक्ष्मीची पूजा करतो, आणि या लक्ष्मीला विसरतो. प्रत्येक घरात जेव्हा या लक्ष्मीची पूजा होईल त्यावेळी प्रत्येक घरात होणारे अत्याचार थांबतील. आज बरेच कुटुंब स्त्रियांवरील अत्याचारांमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. आणि गुरुजींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागल्या.
गुरुजी घरी येण्यापूर्वी जो प्रकार घडला, तो कानावर पडलाच होता. पण, त्या घटनेने जेवढं मन सुन्न झाले नाही तेवढे गुरुजींचे शब्द मनाला लागले. गुरुजी जेवतेवेळही माझ्यासोबत दारू बंदी का व्हावी? यावर चर्चा करत होते. त्यावेळी जाणवले गुरुजींना त्यांच्या अपमानाचे कसू मात्रही दु:ख नाही, त्यांना दु:ख आहे ते समाजात दारूमुळे, अत्याचारांमुळे उध्वस्त होणाऱ्या संसाराची... त्यांना चिंता आहे, ती व्रत न घेतलेल्या पिढीची. दारूमुळे जसा घरातील संसार उध्वस्त होत आहे, तसाच अशा घाणेरड्या वृत्तीच्या तरुणांमुळे आज भारतमातेचा संसार उध्वस्त झाला आहे. आणि हा संसार मान, अपमान या पलीकडे जाऊन सावरण्याचा प्रयत्न गुरुजी करत आहेत.
गुरुजींचे हे शब्द त्या हल्लेखोरांच्या घरातील स्त्रियांपर्यंत पोहचवा.. जेणेकरून त्यांना आपल्या घरातला पुरुष कोणाला विरोध करत आहे याची जाणीव होईल.

देवाच्या मनीं तोष नाही गमला नानारूपें घेऊनी l
सर्वश्रेष्ठ असेल रूप कुठले ही बोच टोचे मनीं ll
चिंतातुर हरी मनात हसला स्फुरले तया उत्तर l
उठला तो अन "मातृरुप" धरिलेंं त्याने स्वयेंं सत्वर ll
गुरुजी म्हणाले, दिवाळीत आपण सर्वजण लक्ष्मीपूजन करतो. प्रत्येकजण आपापल्या शक्तीप्रमाणे मंदिरातल्या देवीची पूजा करतो. पण, आपण घरातल्या पत्नीकडे दुर्लक्ष करतो. दिवाळीत लक्ष्मीपूजना दिवशी सर्वांनी आपल्या पत्नीला बसवून, तिचे पाय धुवून औक्षण करावे, तिची पूजा करावी, कारण घरची लक्ष्मी पत्नी आहे.

आपण निर्जीव लक्ष्मीची पूजा करतो, आणि या लक्ष्मीला विसरतो. प्रत्येक घरात जेव्हा या लक्ष्मीची पूजा होईल त्यावेळी प्रत्येक घरात होणारे अत्याचार थांबतील. आज बरेच कुटुंब स्त्रियांवरील अत्याचारांमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. आणि गुरुजींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागल्या.
केला आघात जरी का कुणी माऊलीवर ।
तत्काळ ठार करुनी नुरु द्या धरेवर ।।
दु:शासनास वधुनी रणी संपविला ।
फाडूनी छाती पितसे भीम शोणिताला ।।
गुरुजी घरी येण्यापूर्वी जो प्रकार घडला, तो कानावर पडलाच होता. पण, त्या घटनेने जेवढं मन सुन्न झाले नाही तेवढे गुरुजींचे शब्द मनाला लागले. गुरुजी जेवतेवेळही माझ्यासोबत दारू बंदी का व्हावी? यावर चर्चा करत होते. त्यावेळी जाणवले गुरुजींना त्यांच्या अपमानाचे कसू मात्रही दु:ख नाही, त्यांना दु:ख आहे ते समाजात दारूमुळे, अत्याचारांमुळे उध्वस्त होणाऱ्या संसाराची... त्यांना चिंता आहे, ती व्रत न घेतलेल्या पिढीची. दारूमुळे जसा घरातील संसार उध्वस्त होत आहे, तसाच अशा घाणेरड्या वृत्तीच्या तरुणांमुळे आज भारतमातेचा संसार उध्वस्त झाला आहे. आणि हा संसार मान, अपमान या पलीकडे जाऊन सावरण्याचा प्रयत्न गुरुजी करत आहेत.
गुरुजींचे हे शब्द त्या हल्लेखोरांच्या घरातील स्त्रियांपर्यंत पोहचवा.. जेणेकरून त्यांना आपल्या घरातला पुरुष कोणाला विरोध करत आहे याची जाणीव होईल.
देशातील प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे. तर आपल्याला केवळ एक माता नाही, तर भारतमाता, जननीमाता, धरणीमाता, गोमाता, गीतामाता, गोमाता आणि जन्मदात्री माता आहेत. एवढ्या आईचे प्रेम सांगणारे गुरुजी असामान्यच. वासनेने पेटलेल्या रणरणत्या अंधकारात
कोणीही नारी जगतीं रखुमाई आहे।
हा भाव रक्ती आमच्या प्रति श्वास वाहे।।
माता न व्यक्ती असते परमात्मारूप।
देवावतार जगतीं खलू मातृरूप।।
गुरुजींचा हा श्लोक देशाला स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवून टाकतो. हा विचार जगातल्या प्रत्येक पुरुषाने केला तर स्त्रीवर होणारे बलात्कार आणि अत्याचार नक्कीच थांबतील.
- नेहा रोहितराव तांबे
- नेहा रोहितराव तांबे

0 Comments